महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । वडिलांना शेतात मदत करायला आला पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. विहिरीतून पाणी काढण्यासाठी वडिलांना मदत करायला आला. त्यावेळी पाय घसरल्याने १२ वर्षांचा मुलगा विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनीही विहिरीत उडी घेतली. वडिलांनी मुलाला वाचवण्याचे प्रयत्न केले.
जीव वाचवण्यासाठी मुलाने वडिलांना मिठी मारली आणि घात झाला. दोघंही विहिरीत बुडाले. घाबरलेल्या मुलाने जीव वाचवण्यासाठी मिठी मारल्याने वडीलही बुडाले. वडील आणि मुलगा विहिरीत पडल्याची माहिती रात्री उशिरा समोर आली. रेस्क्यू करण्यातही उशीर झाला त्यामुळे दोघांचाही जीव वाचू शकला नाही.
ही धक्कादायक घटना केज तालुक्यात घडल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरा जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी गळ टाकून वडील आणि मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
३५ फूट खोल विहिरीत मुलगा पडल्याने वडिलांच्या काळजात धस्स झालं. त्याने मुलाला वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता विहिरीत उडी घेतली. घाबरलेल्या मुलाने जीव वाचवण्यासाठी वडिलांना घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघंही बुडाले. विहीर पाण्याने भरल्याने मृतदेह दिसत नव्हते.
विहिरीच्या पाण्यात कॅमेरा सोडून मृतदेह कोणत्या बाजूला आहेत हे पाहावे लागले. त्यानंतर मृतदेह गळ टाकून काढण्यात आले. पाणी उपसा करून हे मृतदेह बाहेर काढावे लागल्याचे माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे धस कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.