दापोलीतील दोन रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ; शिवसेना नेते अनिल परबांना दणका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या मागे ज्यासाठी ईडीची चौकशी मागे लागली ते रिसॉर्ट अखेर तोडण्यात येणार आहे. दापोली येथे असलेल्या या साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्टवर हातोडा चालवण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालायाने अखेर दिले आहेत.

दरम्यान सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला ३७ लाख ९१ हजार २५० रुपये तर साई रिसॉर्टला २५ लाख २७ हजार ५०० रुरये दंड ठोठावण्यात आला आहे. पर्यावरण तज्ञांच्या टीमने दापोलीतील मुरूड येथील या दोन्ही रिसॉर्टची पाहणी करून यासंबंधीचा आहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात आला होता. या आहवालाच्या आधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २२ ऑगस्टला महाराष्ट्र कोष्टल मॅनेजमेंट अथॉरिटीचे सदस्य सचिव आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र पाठवलं आहे.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्टला पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ समितीने भेट देऊन त्यांनी पाठवलेल्या अहवालातील निष्कर्ष व शिफारशी काय आहेत, याची माहिती पत्रात दिली आहे. सीआरझेड व ना विकास क्षेत्र यामध्ये हे बांधकाम केले असल्याने सीआरझेड कायदा २०११ चा भंग झाला आहे. त्यामुळे ही दोन्ही बांधकामे तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ही दोन्ही बांधकामे तोडल्यानंतर त्याची पुनर्प्रक्रिया किंवा पुनर्वापरासाठी किंवा स्थानिक सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीने विल्हेवाटीसाठी सुरक्षितपणे वाहतूक करणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास हे बांधकाम तोडण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे आणि सक्षम अधिकारी व तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली हे बांधकाम तोडण्यात यावे. तसेच आजूबाजूच्या वातावरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी वृक्षारोपण करून ते क्षेत्र विकसित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *