महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोव्यतील सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी अगोदर नैसर्गिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन प्रक्रिया गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय (जीएमसीएच) येथे होणार होती. परंतु सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रार दिली. सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच तिची हत्या केल्याचा आरोप त्यानं यावेळी केला आहे. त्यामुळे जेव्हा गोवा पोलिस या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करेल, त्यावेळीच कुटुंब पोस्टमार्टमची परवानगी देईल,
फोगाटचा भाऊ ढाका याने गोवा पोलिसात सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच हत्या केल्याची तक्रार केली. फोगाट यांचे मृत्यूपूर्वी आई आणि बहिणीशी बोलणे झाले होते. त्यावेळी त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या आणि आपल्या दोन सहकाऱ्यांची तक्रार करत होत्या.
ढाकाने दावा केला आहे की, त्यांच्या बहिणीच्या मृत्यूनंतर हरियाणा येथील फार्महाऊसचे सीसीटीव्ही कॅमेरा, लॅपटॉप आणि अन्य महत्त्वपूर्ण साहित्य गायब झाले आहे. तसेच तीन वर्षापूर्वी देखील फोगाट यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जेवणात काही मिसळले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल केल्याचे देखील ढाकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोनाली फोगाट कोण आहेत?
हरियाणातली भूथनकला गावात जन्म
2006 साली दूरदर्शनसाठी काम सुरु केलं
2008 साली भाजपमध्ये प्रवेश केला
राजकारणासह सिनेसृष्टीतही काम सुरु केलं
पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट आणि म्यूझिक व्हिडियोत काम
छोरियां छोरों से कम नहीं होती हा पहिला चित्रपट
2016 साली त्यांच्या पतीचा रहस्यमय मृत्यू
2019 मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली
2020 साली बिग बॉसमध्येही सहभागी होत्या