यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांवरील विघ्न दूर, कोकणातील रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । गणरायाचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले आहे. (Ganeshotsav) गणेशोत्सावात मुंबईसह राज्यातून गणेशभक्त हे कोकणात दाखल होत असतात. मात्र, दरवर्षी समस्या असते ती रस्त्याची. (MVA) महाविकास आघाडी सरकारच्या रस्ता दुरुस्तीची कामे झालीच नाहीत आणि ज्या ठिकाणी दुरुस्ती कामे झाली तेथील कंत्राटदाराची बिलेही अदा केली नाहीत. आता राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे यंदा (Problem of Road) रस्त्याची समस्या उद्धभवणार नाही. कारण बांधकाम मंत्री रवी चव्हाण यांनी रस्ता दुरुस्ती कामाचा आढावा घेतलेला आहे. आगामी दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे दरवर्षीची समस्या यंदा निर्माण होणार नाही. तर गतवर्षीप्रमाणे यंदाही मोदी एक्सप्रेस ही भक्तांसाठी असणार आहे. 29 ऑगस्टला ही एक्सप्रेस धावणार आहे.त्यामुळे गणेशभक्तांची सोय होणार आहे. यादरम्यान, भाजप पक्ष, निलेश राणे यांच्या माध्यमातूनही रेल्वेची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशत्सोव हा वेगळा असणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *