‘या’ तारखेपर्यंत देशात लाँच होणार 5G, किंमतीबाबत सरकारकडून मोठा खुलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । तुम्ही 5G सेवा सुरू होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, लवकरच तुम्ही हाय स्पीडवर इंटरनेटचा आनंद घेऊ शकणार आहात. केंद्राने गुरुवारी सांगितले की 5G सेवा भारतात 12 ऑक्टोबरपर्यंत आणल्या जातील, पुढील काही वर्षांत देशाच्या प्रत्येक भागात सेवा उपलब्ध करून देणे आणि त्याची किंमत स्वस्त ठेवण्याचे लक्ष्य असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

देशात 5G सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आम्ही 5G सेवा लवकरच सुरू करण्याची योजना आखत आहोत, दूरसंचार ऑपरेटर त्या संदर्भात काम करत आहेत तसेच त्यांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू होईल आणि नंतर ती इतर शहरांमध्ये विस्तारित करू.

वैष्णव पुढे म्हणाले की, आम्ही 5G पुढील दोन ते तीन वर्षांत देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल अशी अपेक्षा करतो. ते परवडणारे राहील याची आम्ही आम्ही काळजी घेऊ असेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. तसेच हा उद्योग शहरी तसेच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काही रिपोर्टनुसार या सेवा टप्प्याटप्प्याने आणल्या जातील आणि पहिल्या टप्प्यात केवळ 13 निवडक शहरांना हायस्पीड 5G इंटरनेट सेवा मिळेल. या शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वर नमूद केलेल्या या शहरांतील प्रत्येक नागरिकाला 5G सेवा मिळू शकत नाही. हे शक्य आहे की दूरसंचार कंपन्या या शहरांमधील निवडक भागात 5G सुविधा प्रदान करतील ज्याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी स्‍वातंत्र्य दिनाच्‍या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, भारतात लवकरात लवकर 5G लाँच केले जाईल आणि त्‍याचा वेग 4G नेटवर्कपेक्षा 10 पट अधिक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *