महाराष्ट्र 24- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। मुंबई: राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत रविवारी ४४० नी वाढ होऊन ही संख्या आता ८०६८ झाली आहे. यापैकी ११८८ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं एक मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या २७ हजार ८९२ वर पोहचलीय. तर करोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या ८७२ वर पोहचलीय.