महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । नागपूरमधून (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आली आहे. रेल्वेमधून प्रवास करत असताना प्रवाशाला लाथ लागली म्हणून एका तरुणाला धावत्या रेल्वेमधून (Railway) खाली फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेत रेल्वेमधून खाली फेकलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गरिब रथ या गाडमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण नागपूरमधील एका उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास गरीब रथ या ट्रेनमधून निघाले होते.
रेल्वेच्या जनरल डब्यात दाराजवळ हे सर्व तरुण दाटीवाटीने उभे होते. सकाळच्या सुमारास रेल्वे गाडी नागपूर शेजारी बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान आली असता शेख अकबर याचा एका तरुणाला पाय लागल्यामुळे शेख अकबर आणि आरोपींमध्ये वाद झाला. दोघांचा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी तरुणाने शेख अकबरला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली फेकले.
गाडीचा वेग जास्त असल्याने शेख अकबरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून रेल्वे पोलिसांनी (Police) संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलिस करत आहेत.