मुख्यमंत्री शिंदेंनी डान्सबार, जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख आणि सभागृहात हास्यकल्लोळ ; मुख्यमंत्री शिंदेंचं अजित पवारांना उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यात वाढते गुन्हे चिंतेची बाब असल्याचं पवार विधानसभेत म्हणाले. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख केला. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला.

अजित दादा तुम्ही आम्हाला एवढा क्राईम रेट वाढलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, असे दाखले दिले. माझा सांगण्यााचा उद्देश असा आहे की, ठाण्यातील डान्सबार सगळे बंद आहेत. ते पूर्वीचे व्हिडीओ क्लिप दाखवत आहेत. इथे जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. त्यांना माहिती आहे. ते तिकडे (मुख्यमंत्री मिश्किलपणाने हसले), अरे मी काही तुमच्याबद्दल वाईट बोलत नाहीय. तुम्ही जाता म्हणून नाही सांगत मी बघायला. (सभागृहात हशा). मी काय म्हणालो? डान्सबार आपल्याकडे बंद आहेत.

जितेंद्र आव्हाड काहीतरी म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बोलायला लागले. झालं आता. तुमच्याबद्दल चांगलं बोलणंही वाईट आहे. मग वाईट बोलू? दुसरं सांगू इथे सर्वांना? (सभागृहात पुन्हा हशा). यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी तुमच्यावर बोलणार नाही. तुम्ही माझ्याबद्दल बोलू नका. (सभागृहात पुन्हा हशा).

अंमली पदार्थाच्या बाबतीत जून 2022 च्या अखेरपर्यंत 6 हजार 645 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत 1400 कोटींचे एमडी पकडले. पोलीस अंमली पदार्थांना आळा घालण्याचं काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *