महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळून आलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आता एकत्र काम करणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली.