महाराष्ट्र 24- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.२७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील. पंतप्रधान मोदी कोरोना संकट आणि लॉकडाऊनवर चौथ्यांदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. कमीतकमी ९ राज्यांचे मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भाग घेऊ शकतात.
लॉकडाऊन समीक्षा, लॉकडाऊन एक्झिट नंतरची योजना आणि टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याचा आढावा घेण्यासाठी सकाळी १० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. याशिवाय २० एप्रिलपासून काही भागात लॉकडाऊन दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अंशत: सूट, चाचणी किटची स्थिती, डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यांकडून अशीही अपेक्षा केली जात आहे की ते केंद्राकडे आर्थिक पॅकेजचीही मागणी करतील. आधीच्या बैठकीत जवळपास सर्वच मोठ्या राज्यांनी आपले विचार मांडले आहेत.