महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या पक्षाचा व्याप वाढवत आहेत. यासाठी काल गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला पुण्यातून सुरूवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते. त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करत सर्वांना एक आवाहन केलं आहे.
“यावेळेला जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये माझे भाषणं असतील, महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी सदस्याला आमच्याकडून देण्यात येणार आहेत, या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं पहिलं नाव नोंदवलं आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं.” असं अवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.
सध्या राज्यभरात मनसेचे सदस्य नोंदणीची मोहीम सुरू आहे. पुण्यात स्वतः अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑनलाईन नोंदणी करुन सुरुवात केली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून पोस्टर, बॅनर, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन पक्षाचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी आवाहन केले जात आहे. आता राज ठाकरे यांच्या आवाजात नागरिकांना सदस्य नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आवाहन..
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आवाहन..#MNS #rajthackeray @RajThackeray pic.twitter.com/JOosXpahJ5
— News18Lokmat (@News18lokmat) August 26, 2022
काय आहे ऑडिओ क्लपमध्ये?
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगीनींनो आणि मातांनो.. नमस्कार, मी राज ठाकरे हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच कटीबद्ध आहे. आपलं कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण पक्षाची सदस्य नोंदणी नव्याने सुरू करत आहोत. माझं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे, की तुम्ही तर सदस्य व्हायचच आहे. पण, परंतु उतरांनाही म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्नेही यांनाही सदस्य करुन घ्यायचं आहे. त्यानंतर सदस्य नोंदणी ऑनलाईन कशी करायची याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.