महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । Neeraj Chopra Wins Lausanne Diamond League : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत लुसाने डायमंड लीग 2022 वर नाव कोरले आहे. ही स्पर्धा जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने 89.08 मीटरच्या पहिल्या थ्रोने लॉसने डायमंड लीगवर विजय मिळवला.
गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना नीरजच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. अलीकडेच, नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्जनंतर (2003) हे पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.
Tokyo Olympics gold medallist Neeraj Chopra becomes the first Indian to clinch the Lausanne Diamond League with a best throw of 89.08m.
(File photo) pic.twitter.com/tNX3HA1Zvk
— ANI (@ANI) August 27, 2022
हरियाणातील पानिपतजवळील खंडारा गावात राहणारा नीरज चोप्रा डायमंड लीगचा मुकुट जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. चोप्राच्या आधी डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय होता.गौडा यांनी 2012 न्यूयॉर्क आणि 2014 दोहामध्ये दोनदा दुसरे स्थान पटकावले होते, याशिवाय 2015 मध्ये शांघाय आणि यूजीनमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत दोनदा तिसरे स्थान पटकावले होते.