![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,३०० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५४,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,६०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,६३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५४८ रुपये आहे.
