India Vs Pakistan Match: मैदानात हार्दिक ची तर सोशल मीडियाच्या पिचवर शरद पवारांची हवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । भारताने आशिया कपच्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Match) सामन्याकडे अवघा देश डोळे लावून बसला होता. हो नाही करता करता भारतानं मॅच जिंकली. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) सिक्सने सगळा गेम पलटला. ही मॅच जिंकल्यानंतर सगळीकडे हार्दिक आणि त्याच्या सिक्सची सर्वत्र चर्चा झाली. पण याचवेळी सोशल मीडियावर एक व्हीडओने धुमाकूळ घातला. हा व्हीडिओ आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा. मॅच जिंकता क्षणी शरद पवार यांनी आपला हात उंचावत व्हिक्ट्रीची साईन दाखवली. मॅच संपता क्षणी अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हीडिओ ठेवला होता. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरही हा व्हीडिओ पाहायला मिळाला. त्यांचा हा व्हीडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. अवघ्या 11 सेकंदाचा व्हीडिओ अनेकांची मनं जिंकतोय.

व्हीडिओमध्ये काय आहे?
शरद पवार यांचा व्हायरल होत असलेला व्हीडिओ अवघ्या 11 सेकंदाचा आहे. पण या व्हीडिओने अनेकांची मनं जिंकली आहेत. शेकडो लोकांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये शरद पवार निंवात क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे दिसत आहेत. त्यांच्या या व्हीडिओला अनेकांनी पसंती दिली आहे. “जिंदादिल इन्सान…” म्हणत अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

 

सुप्रिया सुळेंचं ट्विट
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या व्हीडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला त्यांनी “आजचा रविवारचा दिवस आनंदी बनवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे आभार!”, असं कॅप्शन दिलं आहे. सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर या व्हीडिओला दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 14 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *