महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । आपल्यापैकी बरेच जण बाप्पाला नाना तऱ्हेचे मोदक नैवेद्य म्हणून ठेवतात परंतु, उकडीच्या मोदकाची चव काही औरच !बाजारात मिळणारे उकडीचे मोदक असो किंवा ते साच्यातून बनवले जाणारे मोदक असो आपल्याला ते फारसे रुचतही नाही व पटतही नाही. पण, सुंदर कळ्या येणारे मोदक आपल्याला जमत नाही. एकतर कळ्या पाडताना ते तुटतात किंवा वाफवल्यानंतर त्याचे सारण त्यातून बाहेर होते. मग अशावेळी आपली चिडचिड होते. तुम्हाला सुंदर कळ्या येणाऱ्या उकडीचे मोदक बनवायचे आहे तर जाणून घेऊया सोप्या टिप्स
१. उकडलेल्या तांदळाच्या (Rice) पिठाचा गोळा घेऊन त्याला चांगले मळून घ्या. नंतर त्याला पीठ लावून त्याची पुरी लाटा.
२. तयार पुरीमध्ये गुळ, खोबरे, ड्रायफ्रूट्स व माव्याचे मिश्रण भरा. सारणाचा गोळा व्यवस्थितरित्या पुरीवर ठेवून घ्या.
३. हातांच्या बोटाला तेल (Oil) लावून घ्या. हातावर ही लाटलेली पुरी घेऊन दोन बोटांच्या मधोमध पुरी पकडून त्याला हळूहळू बोटांच्या साहाय्याने फिरवा व कळ्या पाडून घ्या.
४. कळ्या पाडताना सारणाला अंगळ्याच्या साहाय्याने पकडून ठेवा व हलक्या हाताने ह्या कळ्या पाडत जा.
५. कळ्या पाडू झाल्यानंतर दोन्ही हाताने अलगद त्याला गोलगोल फिरवा. लक्षात ठेवा हात फिरवताना कळ्या दुमडल्या जाणार नाही.
६. मोदकाचे टोक काढून झाल्यानंतर कळ्यांना चमच्याच्या खालचे टोक फिरवून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा उकड काढा व वरुन साजूक तूप घालून बाप्पाला नैवेद्य ठेवा.