पुढील महिन्यात मनोरंजनाचा धमाका; तब्बल 17 चित्रपट होणार प्रदर्शित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । चित्रपट रसिकांसाठी सप्टेंबर महिना म्हणजे मनोरंजनाचा धमाका असेल. या महिन्यात बॉलीवूड, हॉलीवूड, टॉलीवूडचे असे एकूण 17 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘ब्रह्मास्त्र्ा’, ‘विक्रम वेधा’ यासारख्या बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय हॉलीवूडचा ‘अवतार’ हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये झळकेल. टॉलीवूडचे ‘पीएस-1’ सह चार मेगाबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

लॉकडाऊननंतर मनोरंजन इंडस्ट्री सावरताना दिसत आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त बजेटचे एकूण 11 चित्रपट आले. त्यामध्ये 8 दाक्षिणात्य तर सहा बॉलीवूडचे आहेत. दक्षिणेच्या 8 पैकी 5 तर बॉलीवूडच्या 6 पैकी 2 चित्रपटच यशस्वी झाले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षक त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे येत्या काही दिवसांतच समजेल.

रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबर रोजी तर हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ 30 सप्टेंबर रोजी जगभरात झळकेल. याशिवाय ‘अवतार’, ‘पीएस-1’, ‘सरोज का रिश्ता’, ‘जहां चार यार’, ‘मिडल क्लास लव्ह’, ‘मोदी जी की बेटी’, ‘लव्ह यू लोकतंत्र’, ‘सिया’, ‘मट्टो की सायकल’, ‘धोखा’, ‘चूप’, ‘प्रेम गीत’ हे चित्रपट याच महिन्यात येतील. अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ आणि तमन्ना भाटियाचा ‘बबली बाऊन्सर’ ओटीटीवर येईल. 100 कोटी रुपयांच्या ‘कठपुतली’चे डिजिटल हक्क 127 कोटी रुपयांत विकले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *