पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला एका अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टीसी गणेश जाधव यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेचं आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टीसी गणेश जाधव हे पुणे-लोणावळा रेल्वेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार टीसी म्हणून कार्यरत होते. रविवारी पुणे-लोणावळा रेल्वेत जाधव हे आपलं कर्तव्य बजावत असताना पुण्याहून लोणावळ्यात रेल्वे दाखल झाली. एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जात असताना त्यांनी वाटेत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ”बाजूला हो पुढे जायचं आहे”, असे म्हटले. त्यामुळे मुलाने थेट जाधव यांच्या डोळ्यावर बुक्क्यांचा मारा केला. मार इतका जबदस्त होता की, टीसी जाधव यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर गणेश जाधव ह्यांनी आरोपीला पकडून ठेवत प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलसांनी याबाबत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *