महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आठवड्याच्या सुरवातीला सोन्या चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) सोन्याच्या आणि चांदीच्या भावात किंचित घट झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातील हा चढउतार आठवडाभर असाच दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात 150 रुपयांनी बदल झालेला आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत 54,000 रुपये प्रति किलो झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क यामुळे सोन्याच्या किंमती बदलतात.
आज चांदीच्या किंमतीतही मोठा बदल झाला आहे आणि सरासरी किंमत 54,000 रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि पटना मध्येही किंमत 54,000 रुपये प्रति किलो आहे.