पिंपरी रस्त्याने विनाकारण फिरताना हटकल्याच्या रागातून पोलिसांवर हल्ला; गुन्हा दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४, ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पिंपरी- रस्त्याने विनाकारण फिरताना हटकल्याच्या रागातून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना काळेवाडी येथील मशिदीजवळ सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, युनूस गुलाब आत्तार, मतीन युनूस आत्तार, मोईन युनूस आत्तार (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी काळेवाडी येथील मशिदीजवळ आरोपी युनूस आतार हा विनाकारण फिरत होता. पथकातील पोलीस कर्मचारी कळकुटे यांनी त्यास घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. या रागातून युनूस आणि त्यांची दोन मुले मतीन आणि मोईन यांनी आपसात संगनमत करून कळकुटे यांना मारहाण केली. यातील आरोपी मतीन हा रेल्वे पोलीस आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *