महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची स्थापना आणि पूजेसाठी दिवसभरात एकूण 6 शुभ मुहूर्त असतील. सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 11.20 ते दुपारी 01.20 पर्यंत असेल, कारण हा मध्याह्न काळ असेल, ज्यामध्ये श्रीगणेशाचा जन्म झाला होता.
तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्ण कुमार भार्गव आणि पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र सांगतात की, श्रीगणेशाची स्थापना आणि पूजा दुपारीच करावी. वेळ न मिळाल्यास कोणत्याही शुभ लग्न किंवा चोघडिया मुहूर्तावर गणपतीची स्थापना करता येते. यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी 300 वर्षांनंतर ग्रहांची शुभ स्थिती निर्माण होत असून लंबोदर योगही जुळून येत आहे.
जर तुम्हाला एवढ्या गोष्टींनी पूजा करणे शक्य नसेल, तर छोटी पूजा पद्धत
1. चौरंगावर स्वस्तिक बनवा आणि चिमूटभर तांदूळ ठेवा.
2. त्यावर लाल दोरा गुंडाळलेली सुपारी ठेवा. या सुपारी गणेशाची पूजा करा.
3. हे करणेही शक्य नसले तर श्रद्धेने मोदक आणि दुर्वा अर्पण केल्यानेही देवाची कृपा प्राप्त होते.
संपूर्ण गणेशोत्सवात दररोज गणपतीच्या केवळ तीन मंत्रांचा जप केल्यानेही पुण्य प्राप्त होते. सकाळी स्नान करून, श्रीगणेश मंत्रांचे पठण करून, नतमस्तक झाल्यानंतर ऑफिस-दुकान किंवा कोणत्याही कामासाठी निघावे. (डॉ. कृष्ण कुमार भार्गव, केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालय, तिरुपती यांच्यानुसार)
गणपती पूजेशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा
1. गणेशाच्या मूर्तीवर तुळस आणि शंखाने जल अर्पण करू नये.
2. दुर्वा आणि मोदकाशिवाय पूजा अपूर्ण राहते.
3. गणपतीची आवडती फुले: कण्हेर, कमळ, चंपा, मौलश्री (बकुळ), झेंडू, गुलाब
4. गणपतीची आवडती पाने: शमी, दुर्वा, कण्हेर, केळी, बोर, मदार आणि बिल्वची पाने
5. पूजेत निळे आणि काळे कपडे घालू नका.
6. चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवून पूजा करा.
7. स्थापनेनंतर मूर्ती हलवू नका.