केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली आदित्य ठाकरेंची उंदराशी तुलना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसैनिकांनी एकत्र आणण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) हे राज्यभरात निष्ठा यात्रा करत आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने टीव टीव करत हा उंदीर महाराष्ट्रभर फिरत आहे, अशा शब्दांत भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे.

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यभरात दौरे करत आहे. शिवसैनिकांना जाऊन भेटून संवाद साधत आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून नारायण राणे यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे. तसंच नारायण राणे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची बाजू घेतली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने टीव टीव करत हा उंदीर महाराष्ट्रभर फिरत आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: च्या कर्तुत्वावर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. दसरा मेळावा जर झाला तर तो एकनाथ शिंदे घेतील. जर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी नक्की येईल, असं नारायण राणे म्हणाले.

शिंदे आणि फडणवीस सरकार हे सत्तेवर आले आहे. हे पर्मनंट सरकार आहे. आधीचे कंत्राटी सरकार गणपती बाप्पाने खाली खेचले आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं अपमानित होऊन कुणालाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं नाही. उद्धव ठाकरे यांनी फक्त 3 तास मंत्रालयामध्ये काम केलं, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

बाळासाहेबांच्या नावाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. आता तुम्ही निवृत्त झाला आहात, त्यामुळे तुम्हाला आता बोलण्याचा अधिकार नाही, टीका करण्याचा अधिकार नाही. आता घरी बसा. स्वत: च्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्धा लायकी नाही, अशी टीकाही राणेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *