या मंदिराला 700 वर्षांची परंपरा ; इथं महादेवासमोर नंदी नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून जगभरात ओळखले जाते. अनेक ऐतिहासिक,पुरातन वास्तूंचा वारसा हा नाशिकला लाभला आहे.त्यामुळे जगाच्या नकाशावर नाशिकचं महत्व विशेष आहे.

विशेष म्हणजे नाशिक शहरात गोदावरी किनारी,रामकुंड परिसरात वसलेेल श्रीकपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे.की या मंदिरात शंकर महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही. जगभरातील प्रत्येक मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीच स्थान आहे.700 वर्षांची परंपरा या मंदिराला आहे. या मंदिरात नंदी नसण्यामागे काही पुरातन संदर्भ आणि अख्यायिका सांगितल्या जातात.

मंदिरात दर्शनाची वेळ

श्रीकपालेश्वर महादेव मंदिर हे पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं,जगभरातून भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी असल्यामुळे भाविकांचा ओघ जास्त असतो.

मंदिरातील आरतीची वेळ

पहाटे 5 वाजता मंदिर उघडल्यानंतर पुजा अभिषेक करून आरती होते.त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आरती होते. आरतीसाठी भाविकांना प्रवेश दिला जातो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *