महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । क्रिकेटमध्ये सध्या आशिया कपचा थरार सुरू आहे. स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर संघातील लढत झाली असली तरी अन्य संघातील लढती चुरशीच्या होत आहे. प्रत्येक सामन्यासाठी त्या त्या संघाचे चाहते स्टेडियमवर उपस्थित असतात.
आशिया कपमध्ये मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. या लढतीत स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चेहऱ्याकडे सर्वांचे लक्ष गेले. अफगाणिस्तान संघाच्या झेंड्यासह स्टेडियममध्ये उपस्थित असलली वाजमा अयूबी हिची चर्चा इतकी झाली की चाहते मॅच सोडून तिच्याकडे पाहू लागले.
Thank you @WazhmaAyoubi for Supporting #AfghanAtalan#SuperFan!#AFGvBAN #AFGvsBAN #AsiaCup2022 ❤️ pic.twitter.com/aqZYM7sJpa
— AfghanAtalan (@AfghanAtalan1) August 31, 2022
कोण आहे वाजमा
रिपोर्टनुसार वाजमा अयूबी ही अफगाणिस्तानमधील एक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. तिला क्रीडा क्षेत्रात देखील रस आहे. वाजमा संघाला चीअर करत असताना सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला. अफगाणिस्तानने मंगळवारी शारजाहच्या मैदानावर ग्रुप बी मध्ये बांगलादेशचा सात विकेटनी पराभव केला. या विजयाबरोबर त्यांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केला.