पुणेकरांसाठी खूशखबर! आला नवा आदेश, लॉकडाऊनमध्ये मिळणार ही सूट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । पुणे । विशेष प्रतिनिधी। ओमप्रकाश भांगे । मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. निर्बंधांची कडक अंमलबजावणी करूनही पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचली आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातून नागरिकांना हलवण्याचा उपाय पुणे महापालिकेने सुचवला आहे. त्यात लॉकडाऊनबाबत पोलिसांनी पुणेकरांसाठी नवा आदेश जारी केला आहे.

पुणे पोलिसांचे लॉकडाऊन संबंधीचे नवे आदेश सोमवारी जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकानं आता 2 तासांऐवजी 4 तास खुली राहणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत लोक भाजीपाला, दूध, किराणा मालासाठी घराशेजारच्या दुकानात जाऊ शकतात. असं पुण्याचे सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी नव्या आदेशात म्हटलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विनंतीनुसार दुकानांची वेळ वाढवून दिल्याची माहिती सहपोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *