लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका, एका दिवसात १०३७ गुन्हे दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । मुंबई । विशेष प्रतिनिधी। मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांनी कलम १८८चे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दुपारपर्यंतच्या काळात १०३७ नवीन गुन्हे दाखल करण्यात आलेआहेत. आतापर्यंत एकूण ७३ हजार ७३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

देशात कोरोनाचे संकट असल्याकारणाने २२ मार्चपासून लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले. राज्यातही लॉकडाऊन सुरु आहे. या काळात कोरोना विषाणूच्यासंदर्भात लागू केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई केली आहे. सोमवारपर्यंत कोविड १९ च्या अनुषंगाने पोलिसांच्या १०० क्रमांकावर ७८ हजार ४७४ एवढ्या तक्रारी आल्या होत्या. क्वारंटाईनचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६१० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *