दूध उत्पादकांना दिलासा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । मुंबई । विशेष प्रतिनिधी। : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.

राज्यावर कोरोनाचे संकट आहे. शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक अडचण जाणवत आहे. दुधाचे भाव पाडल्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करुन दूध उत्पादकांना दिलासा देण्यात येणार आहे. तशा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कोरोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली असून दुधाची विक्री १७ लाख लिटरने कमी झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन महिन्यांकरिता ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर दुध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे खर्च करण्यात येईल, असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरिक्त दूध भुकटी व लोणी एनसीडीएफआयच्या ई पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यास आणि त्यासाठी सेवा शुल्कापोटी ०.३ टक्के खर्चास देखील मान्यता देण्यात आली. ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांच्यामार्फत राबविली जाईल. शासन आणि सहकारी संस्था यांच्याकडून दूध संकलित केले जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *