पिंपरीत कोरोना रुग्णांची १०० री पार , 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । पिंपरी-चिंचवड। विशेष प्रतिनिधी। : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आज (मंगळवारी) निगडी-रुपीनगर येथील नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रुपीनगर हॉटस्पॉट झाला असून आजपर्यंत परिसरात 26 रुग्ण आढळले आहेत. तर, खडकीतील पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या 50 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 73 वर पोहचला असून आजपर्यंत 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 29 जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने सोमवारी (दि. 27) 171 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यात निगडी-रुपीनगर परिसरातील सहा पुरुष आणि तीन महिला असे तब्बल नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 16, 18, 22, 27, 34 वर्षीय पुरुष आणि 15, 18 आणि 19 वर्षीय महिला रुग्ण आहेत. रुपीनगर परिसर हॉटस्पॉट झाला असून आजपर्यंत या परिसरात 26 रुग्ण आढळले आहेत. आज नऊ, काल (सोमवारी) पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तर, 23 एप्रिल रोजी एक आणि 24 एप्रिल रोजी 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. एका रुग्णाच्या
हायरिस्क कॉन्टॅक्टमधून सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.याशिवाय खडकीतील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या 50 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *