महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ सप्टेंबर । देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे जनतेत केंद्र सरकारविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. यादरम्यान केंद्र सरकारने गुरुवारी कमर्शिअल एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले, मात्र 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे वाढीव दर ‘जैसे थे’च ठेवले.
नव्या दरकपातीनुसार, कमर्शिअल एलपीजी सिलिंडर मुंबईत 92.50 रुपयांनी, दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकातामध्ये 100 रुपयांनी तसेच चेन्नईत 96 रुपयांनी स्वस्त होणार आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये 6 जुलैपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करणे भाग पडत आहे.