महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । कोरोनो संसर्गाच्या दोन वर्षांनंतर उत्सवांना उधाण आले. तरी ऐन गणेशोत्सवात फुले कोमेजली आहेत. अवकाळी पावसाचा फुलशेतीला फटका बसल्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत. धुळे शहरातील बाजारपेठेत निशिगंधा 400 रुपये किलो, झेंडू 120 किलो, गुलाब प्रतिनग 10 रुपये अशा महागडय़ा दराने गणेशभक्तांना फुले खरेदी करावी लागत आहेत.
धुळे जिह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक शेती न करता फुलशेतीकडे वळले आहेत. मात्र अवकाळी पावसात शेतकऱयांना नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्चही निघणार नाही अशी वेळ शेतकऱयांवर आली आहे. सध्या सण-उत्सवांचा माहौल आहे. धार्मिक कार्यक्रमात फुलांची मागणीही वाढली आहे. यासाठी नजीकच्या नाशिक, संगमनेर, पुणे, चांदवड भागांतून फुलांची आवक केली जात आहे. याचा परिणाम फुलांच्या विक्रीवर झाला आहे.