महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । आशिया कपमधील आणखी एक हाय व्होल्टेज सामना रविवारी खेळल्या जाणार आहे. आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने दोन सामन्यात विजय मिळवून सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. पाकिस्तानने त्याचवेळी शुक्रवारी हाँगकाँगविरुद्ध मोठा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही संघ 10 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमने-सामने आली होती. गेल्या वर्षी याच मैदानावर भारताने टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारची घातक गोलंदाजी यामुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता.
आशिया चषक 2022 च्या सुपर-4 मध्ये अ गटा मधून भारत आणि पाकिस्तान तर ब गटातून अफगाणिस्तान आणि श्रीलंकाने स्थान निश्चित केले आहे.
पहिला सामना शनिवारी (3 सप्टेंबर) – श्रीलंका आणि अफगाणिस्तान
दुसरा सामना रविवारी (४ सप्टेंबर) – भारत आणि पाकिस्तान
तिसरा सामना मंगळवारी (6 सप्टेंबर) – भारत आणि श्रीलंका
चौथा सामना बुधवारी (7 सप्टेंबर) – अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
पाचवा सामना गुरुवारी (८ सप्टेंबर) – भारत आणि अफगाणिस्तान
सुपर-4 चा शेवटचा सामना शुक्रवारी (9 सप्टेंबर) – पाकिस्तान आणि श्रीलंका
भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत
आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला. यापूर्वी 2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने पराभव केला.