महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । जालन्यातील पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीचे त्याच्याच पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मी स्वतः दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं, असं सांगणारी व्हिडिओ क्लिप पोलिसाने व्हायरल केली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बायको आपल्या बायकोची खास मैत्रीण असल्याचंही त्याचं म्हणणं आहे.
गेल्या 2-3 दिवसांपासून जालना जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या क्लिपद्वारे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्याच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे व आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. त्यांना आपण रंगेहाथ पकडल्यानंतर अधिकारी पळून गेला, तर पत्नी माहेरी गेली, असं पोलिसाने सांगितलंय. या व्हायरल व्हिडिओमुळे जालना जिल्ह्याच्या पोलीस दलातील हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
मी, बायको आणि माझ्या साहेबांना नको त्या अवस्थेत पाहिलं, साहेब पळून गेले माझ्या खोलीतून, बायको घाईघाईने धावत गेली आणि कंडोम टॉयलेटमध्ये फेकला, मी हात घालून कंडोम बाहेर काढला, बायको अजूनी माहेरी आहे, मी तिला खूप कन्व्हिन्स केलं, पाया पडलो, तुला परत नांदवतो, असं सांगितलं. व्हायची ती बदनामी झालीच, असं पोलीस व्हिडिओत म्हणतो. ज्याने चुकीचं केलं, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मी आणि माझी मुलं उघड्यावर आलो, मला न्याय द्या, तिच्यावर गुन्हा दाखल करा, अशी विनंती पोलीस करतोय.
आपण बायकोला माहेरी आणण्यासाठी गेलो होतो, तिला खूप समजावले, परंतु त्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या बायकोला पैशांची लालुच दाखवत तक्रार न करण्याचे सांगितल्याचे पोलिस या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
त्या अधिकाऱ्याची बायको आणि आपली बायको या खास मैत्रिणी असून त्या अधिकाऱ्याच्या बायकोने देखील आपल्या बायकोला पैसे देण्याचे आमिष दाखवल्याचे या क्लिपमध्ये उल्लेख आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याचा दरारा चांगलाच असून देवधर्माच्या मार्गावर असणाऱ्या या अधिकाऱ्याची ओळख चांगला कीर्तनकार म्हणूनही आहे. त्यामुळे या प्रकरणातील व्हिडिओ-ऑडियो क्लिपने जिल्हाभरात खळबळ उडविली आहे.