महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ सप्टेंबर । गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) सुरुवात होऊन आता सहा दिवस उलटून गेले आहे. काल (4 सप्टेंबर) पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. आज (5 सप्टेंबर) सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे.
दरम्यान गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा तसं कोणतंही बंधन नसल्याने सर्वत्र विसर्जन मिरवणुका या जल्लोषात निघणार आहेत.
गौरी विसर्जनाचा मुहूर्त
शनिवारी 3 सप्टेंबर रोजी गौराईचं सोनं पावलांनी आगमन झालं. रविवारी गौरी आवाहन पार पडलं. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज (5 सप्टेंबर) सोमवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जनासाठी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे.