शिवसेनेतील शिंदेंची जागा कुणाला तरी हवी होती, म्हणून वाद मिटून दिला नाही ? उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ सप्टेंबर । शिवसेनेमधली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जागा कुणाला तरी हवी होती, त्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. न्यूज18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उदय सामंत बोलत होते. ‘शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेलेले असताना ठाकरे गटातील काही नेत्यांनी मुद्दाम या दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र येऊ दिलं नाही. चर्चा होऊन नाराजीवर तोडगा निघू दिला नाही,’ असं विधान उदय सामंत यांनी केलं.

‘एकनाथ शिंदेंची जागा ठाकरेंच्या शिवसेनेतील कुणाला तरी हवी होती, म्हणून वाद मिटून दिला नाही. मी गुवाहाटीला जाण्याआधी इकडे होतो, तेव्हाही मी तोडण्याचा प्रयत्न करू नका, जोडण्याचा प्रयत्न करा, हे सांगत होतो. एकनाथ शिंदेंसारखा नेता जेव्हा बाजूला जातो तेव्हा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कुणाचं चूक कुणाचं बरोबर यापेक्षा शिंदे साहेब परत आले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे होते,’ असं उदय सामंत म्हणाले.

‘शिंदे गेल्यामुळे स्पेस निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांची जागा मी घेऊ शकतो, असं अनेकांना वाटलं, त्यामुळे ते परतच येऊ नये यासाठी काही लोकांनी व्यूहरचना केली’, असा खळबळजनक दावा सामंत यांनी केला.

‘कोणालाच जोडायचं नसेल आणि जोडण्याची भूमिकाच कोणी घेत नसेल मग मी तीन दिवसांनी निर्णय घेतला. इकडे शिंदेंशी बोला सांगायचं आणि त्यांचं नेतेपद काढून घ्यायचं. राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊन निषेधाचा ठराव मांडायचा, जोडायचं असेल तर असं होऊ नये, या मताचा मी होतो. आदित्य ठाकरेंशी चर्चा करून मी गेलो. तोडू नका जोडा हे सांगून मी निघालो,’ असं वक्तव्यही उदय सामंत यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *