Online Fraud : ऑनलाईन बँकिंग फ्रॉडपासून कसे सुरक्षित राहाल ? या गोष्टी लक्षात ठेवा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । डिजिटल युगात प्रत्येक सुविधा सहज उपलब्ध आहे. जर तुमच्या हातात स्मार्टफोन असेल तर तुमचे बँक खाते घरी बसूनही मॅनेज केले जाऊ शकते. म्हणजेच बँकिंग सुविधांसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याचा त्रासही सहन करावा लागणार नाही. पण सुविधांच्या या युगात तुमची दक्षताही खूप महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही काळापासून ऑनलाइन बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

ग्राहकाच्या छोट्याशा चुकीमुळे बँक खाते काही सेकंदात रिकामे व्हायला वेळ लागत नाही. तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनद्वारे किंवा डिजिटल पद्धतीने तुमचे आर्थिक व्यवहार करत असाल, तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा.

तुम्ही स्मार्टफोनद्वारे किंवा डिजिटल पद्धतीने ऑनलाइन बँकिंग वापरत असाल, तर पासवर्डच्या बाबतीत निष्काळजी होऊ नका. कधीकधी सहजतेसाठी आपण काही खात्यांचे पासवर्ड सोपे ठेवतो जेणेकरून लॉग इन करताना जास्त त्रास होऊ नये. पण बँकिंग खात्याच्या पासवर्डच्या बाबतीत असा विचार करू नका. पासवर्ड तुमच्या वाढदिवसाचा किंवा कोणत्याही सोप्या अंकाचा असेल तर पासवर्ड जाणून घेण्यासाठी सायबर घोटाळेबाजांना फारशी मेहनत करावी लागत नाही.

सायबर ठग ग्राहकांची अनेक प्रकारे फसवणूक करण्याच्या योजना आखतात. अनेकवेळा सायबर ठग तुमच्यावर नजर ठेवून असतात आणि लालच देऊन फसवणुकीचा सापळा लावतात. तुम्ही सोशल मीडिया अकाउंट वापरत असल्यास अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. अनेक वेळा चॅटिंग अॅप व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरच्या लिंक्सही येतात. या लिंक्स उघडण्यासाठी तुम्हाला बक्षीस जिंकण्याचं लालच दिलं जातं. चुकूनही अशा लिंक उघडू नका. ताबडतोब खाते ब्लॉक करा आणि नंबर हटवा.

प्रत्येक अॅपला अपडेटची आवश्यकता असते आणि प्रत्येक अपडेट अधिक चांगली वैशिष्ट्ये आणि फायदे आणते. तुम्ही नेहमी UPI पेमेंट अॅप अपडेट केले पाहिजे. तुमच्या फोनवर अनेक पेमेंट अॅप्स वापरणे टाळा आणि केवळ Playstore किंवा App Store वरून विश्वसनीय आणि खातरजमा केलेले पेमेंट अॅप्स डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *