एकाचवेळी दोन पुरूषांशी संबंध; जन्माला आली अशी जुळी मुलं; डीएनए रिपोर्ट पाहून बसला धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । १९ वर्षीय मुलीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मुलांचे वडील हे वेगळे आहेत. वास्तविक पाहता मुलीचे एकाच दिवशी दोन्ही पुरुषांशी संबंध आल्याने ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. जन्माला आलेल्या या जुळ्या बाळांच्या डीएनए रिपोर्टमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून गरोदर राहण्याची घटना फार कमी ऐकायला मिळते. बाळांच्या जन्मानंतर ८ महिन्यांनी या मुलांची डीएनए टेस्ट केल्यानंतर हे सत्य समोर आले आहे, ही मुलं आता दीड वर्षांची आहेत.

ब्राझीलच्या गोयासमधील मिनेरिओस येथील या अज्ञात महिलेने एकाच दिवशी दोन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर नऊ महिन्यांनी या जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर आठ महिन्यांनी तिने या मुलांची डीएनए टेस्ट करून पाहिली. त्यानंतर आलेल्या रिपोर्टनुसार या महिलेला आणि डॉक्टरांनादेखील धक्काच बसला. कारण तिने जन्म दिलेल्या जुळ्या बाळांचा डीएनए सारखा नव्हता. ही जुळी मुलं म्हणजे त्यांचे डीएनए सारखेच असायला पाहिजे होते, पण या मुलांचे डीएनए मात्र वेगवेगळे होते. म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या या जुळ्या मुलांचे वडील मात्र वेगवेगळे होते.

ही मुले जुळी असल्याने मुलांचे चेहरे एकमेकांशी जुळत होते, पण यांचे वडील वेगवेगळे असू शकतील याचा विचारही या तरुणीने केला नव्हता. त्यानंतर या तरूणीने मोठा खुलासा केला की, ती एकाच वेळी दोन पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यामुळेच तिच्यासोबत असं झालं असावं. डिएनएचा हा रिपोर्ट पाहून स्वतः ही तरूणी देखील हैराण झाली.

डेली मेल रिपोर्टनुसार, या महिलेच्या बाबतील झालेल्या घटनेला वैद्यकीय भाषेत याला हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्युंडेशन असे म्हणतात. जगातील हे असं 20 वं प्रकरण आहे. जेव्हा महिलेचं बीजांड दोन वेगवेगळ्या पुरुषांच्या शुक्राणूने फलित होतं, तेव्हा अशी जुळी जन्माला येतात. ज्याचं जेनेटिक घटक आईचं असतं पण प्लेसेंटा वेगळे असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *