महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । मुंबई ।राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 25, जळगाव येथील 4 तर पुणे शहरातील 2 आहेत. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता एकूण 400 झाली आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे आज 106 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने दिलेली माहिती अशी की, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,29,931 नमुन्यांपैकी 1,20,136 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत.