महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली ।लॉकडाऊनमुळे सगळा देश ठप्प आहे. व्यवहारच बंद असल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. आयटी आणि इतर डिजिटल क्षेत्रातली मंडळी मात्र सध्या घरूनच काम करत आहे. त्यामुळे Work From Home हा शब्द चर्चेत आहे. कोरोनाचा वेग वाढतच असल्याने लॉकडाऊनमध्ये सुट मिळाली तरी अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावण्यास इच्छूक नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मोठी घोषणा केली आहे.
आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापर्यंत घरूनच काम करू देऊ शकतात अशी घोषणा त्यांनी आज केली. गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरून काम करण्याचा पर्याय हा चांगला आहे. त्यासाठी आयटी कंपन्यांना काही नियमांमध्ये सुट हवी आहे. ती सुट त्यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
इंटरनेटचा वेग कायम ठेवण्यासाठी Bharat Net मदत करणार असल्याची घोषणाही त्यांनी कली. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर वाढल्याने नेट कंपन्यांवर त्याचा दबाव पडतोय. त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टिकरण दिलं.
महामारी #COVID19 के मद्देनजर केंद्र ने IT पेशेवरों को 31 जुलाई तक घर से काम करने की अनुमति दी है: कर्नाटक के उप मुख्यमंत्री डॉ सी.एन. अश्वथ नारायण
— ANI_HindiNews (@AHindinews) April 28, 2020
येणाऱ्या काळात सर्व राज्य सरकारने नव्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स ला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.