महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली ।कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद आहे. महसूल वाढावा यासाठी मद्यविक्री सुरू करा, अशी मागणी एकीकडे सरकारकडे केली जात आहे. परंतु, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नवी दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी मद्यपान करणार्यांना इशारा दिला आहे.
अल्कोहोल पिण्यामुळे रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा लोकांना कोरोना विषाणूमूळे असुरक्षित होण्याचा धोका जास्त असतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्याच वेळी, पंजाब, केरळ आणि इतर राज्ये दारूची दुकाने उघडण्याचा मानस आहेत आणि महसूलसाठी लोकांचे जीवन धोक्यात घालत आहेत. याच प्रकारचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने देखील दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या काळात दारूची दुकाने उघडणे धोकादायक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दारूची दुकाने लॉकडाउन दरम्यान ही दुकाने बंद ठेवली आहे हे योग्यच आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नवी दिल्लीतील एम्सने स्पष्ट केलं आहे.