बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करून खून ; खंडणीची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । लक्ष्मण रोकडे । दि. १० सप्टेंबर । पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आला आहे. मुलाचे अपहरण करुन अपहरणकर्त्याने खून केल्याचे समोर आले आहे. तर मुलाच्या वडिलांकडे 20 कोटी रुपयांची मागणी केल्याचेही समोर येत आहे. हा प्रकार पैश्यांसाठी की आणखी कश्यासाठी झाला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

आदित्य गजानन ओगले 7, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य हा गुरुवारी सायंकाळी उशिरा पर्यत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी शोध घेतला, तो सापडला नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

आदित्य बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान गजानन ओगले यांना एक फोन आला आणि त्याने 20 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या पथकाच्या सहायाने तपास केला.

एका संशयितास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी परिसरात एका कंपनीच्या टेरेसवरती आदित्य याचा मृतदेह आढळून आला. आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यवसायिक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *