….. हे चित्र बरं दिसत नाही, पुढच्या वर्षी समुद्रात विसर्जन नको, अमित ठाकरेंचं आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । गेल्या 10 दिवसांपासून गणरायाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर निरोप देण्यात आला आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी, जुहू समुद्र किनाऱ्यावर गणरायाचं विसर्जन (ganpati visarjan 2022) करण्यात आलं आहे. पण, आज दुसऱ्या दिवशी समुद्राच्या लाटेमध्ये गणपतीच्या दुभंगलेल्या मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर आल्या आहे. मनसेचे अमित ठाकरे (amit thackery) यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम सुरू आहे.

दादर चौपाटीवर मनसेतर्फे समुद्रकिनाऱ्याची सफाई केली जात आहे. अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनानंतर समुद्रकिनारी मूर्तीचे अवशेष पडलेले दिसतात, निर्माल्यासोबत प्लास्टिकचाही कचरा असतो. हे वाळूत रुतलेले अवशेष आणि निर्माल्य काढण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे. मनसे नेते आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू आहे. IES Modern School चे शिक्षक- विद्यार्थी, कॉलेजचे काही तरूण या मोहीमेत सहभागी झाले आहेत.

अलिबाग, जुहूसह 14 ठिकाणी आम्ही मोहीम राबवत आहोत आणि त्याचा उद्देश एकच आहे की, दरवर्षी आपण 10 दिवस मोठ्या उत्साहाने, चांगल्या वातावरणात बाप्पाची सेवा करतो. पण 11 व्या दिवशी समुद्रामध्ये गणेश मूर्ती वाहून आलेल्या पाहण्यास मिळतात. कुठे गणपतीच्या मूर्ती या अर्धवट तुटलेल्या असतात, हे दृष्य पाहण्यास योग्य वाटत नाही, अशी भावना अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.

तर दुसरीकडे, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी गणेशाच्या मूर्तीचे अवशेष आढळतात, त्याचसोबत निर्माल्यसुद्धा मोठ्या प्रमाणात साचतं, याची स्वच्छता करण्यासाठी अमृता फडणवीसांच्या नेतृत्वात दिव्यज फाऊंडेशनतर्फे जुहू बीचवर एक मोहीम राबवण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येत तरूणही सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *