आम्ही लवकरच सत्तेत येणार !:मनसे नेते अमित ठाकरेंचे सूचक वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । आम्ही लवकरच सत्तेत येणार, असे सूचक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले आहे. सत्ता मुंबईत येईल की राज्यात, हे मात्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे.

अमित ठाकरे यांनी आज दादर चौपाटीवर जाऊन स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. यावेळी गणेशोत्सवानंतर चौपाटीवरील अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अमित ठाकरे म्हणाले, 10 दिवसांच्या उत्सवानंतर असे दृश्य पाहवत नाही. समुद्र किनाऱ्यांवर कायमस्वरुपी स्वच्छता ठेवण्यासाठी हाताशी शासकीय यंत्रणा हव्या असतात. आम्ही सत्तेत आल्यावर याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करणार. लवकरच सत्तेत येणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *