महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. 17 तारखेला पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह असतो की माझा वाढदिवस साजरा करू नका, जनतेची सेवा करा, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. 17 तारखेला पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह असतो की माझा वाढदिवस साजरा करू नका, जनतेची सेवा करा, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या 15 दिवसांमध्ये जनतेची सेवा करणार आहोत. जनतेची जी काही प्रलंबित प्रकरण आहे, ते निकाली काढणार आहोत. यामध्ये अगदी रेशन कार्डची सुद्धा रखडलेली काम करणार आहोत’ असं फडणवीस यांनी सांगितलं.
‘राज्यामध्ये जे आपत्ती प्रवन श्रेत्रासाठी कोणते धोरण नाही, त्यामुळे या सर्व जिल्ह्यात अतिसंवदेनशील क्षेत्र आहे, त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
‘आम्ही अशी चर्चा केली असं ऐकीव बाजूवर जाऊ नका, माझी आणि मुख्यमंत्री शिंदे सोबत प्रशासकीय पातळीवर चर्चा झाली. दादरमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, असं फडणवीस म्हणाले.
‘मुंबईची अवस्था हजार कोटी रुपये करून काम केले आहे. नागपूरमध्ये तर अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.