महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पत्राकरांशी संवाद साधला. यावेळी आपण पक्षात नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण कशासाठी नाराज होऊ, असा सवाल त्यांनी केला. आपल्याला पक्षाने उपमुख्यमंत्रीपद दिले होते. आता आपल्याकडे विरोध पक्षनेतेवद आहे. पक्षात पद आणि जबाबदारी असताना नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीत झाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी अधिवेशनात मार्गदर्शन केले. यात जयंत पाटील यांनी राज्याची भूमिका मांडली. आपण राष्ट्रीय पातळीवर बोलत नाही, मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपण बोललो नाही. त्यावर राजकीय तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. मात्र, त्यात तथ्य नसून आपण नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत पत्रकारांनी सातत्याने प्रश्न विचारल्यावर मी नाराज नाही, स्टँप पेपरवर लिहून देऊ का? अशा आपल्या खास स्टाइलमध्ये त्यांनी उत्तर दिले.
जयंत पाटील मार्गदर्शन करत असताना आपण लंघुशंकेसाठी बाहेर गेलो, तर त्याचीही चर्चा झाली. त्यामुळे वस्तूस्थितीला धरून बातम्या देण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांची आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तुम्ही तुमचे गैरसमज दूर करा. कणतीही नाराजी किंवा पक्षआत गैरसमज नाही. आपले कार्यकर्तेही नाराज नाही. आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शंका दूर करू, असेही ते म्हणाले. आपण राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शन करत नाही. राज्यात असलेल्या कार्यक्रमात आपण आपली भूमिका मांडतो. त्यामुळे तुमचे गैरसमज दूर करतो. तुम्ही राज्यातील समस्या आणि परिस्थितीतवर लक्ष द्या. पक्षाने आपल्याला डावलले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपली कोणतीही नाराजी नसल्याचे ते म्हणाले.