राज्यात ‘या’ जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर, दुसऱ्या राज्यात जाणारी वाहतूक ठप्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । नांदेड जिल्ह्यातील बिलोलीकडून तेलंगणा राज्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. संततधार पावसाने मांजरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. कालपासून संततधार पाऊस बरसत असल्याने या परिसरात चोहीकडे पाणीच पाणी झालं आहे तर येजगी गावाजवळ मांजरा नदी सध्या धोक्याच्या पातळीजवळून प्रवाहित झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

तेलंगणा राज्यात जाणारी वाहतूक कुंडलवाडी धर्माबाद मार्गे वळवण्यात आल्याने वाहन धारकांना मोठा फटका बसला आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यात काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे रस्ते, नाले जलमय झाले आहेत. या पावसामुळे बिलोली शहरातील जनजिवन प्रभावीत झालं असून २० दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार आगमन केल्याने सोयाबीन, कापूस, गहू पिकांना जिवदान मिळाले आहे.

दरम्यान, बिलोली शहरातील रस्ते जलमय झाले असून रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानूसार, पाऊस दाखल झाल्याने बळीराजा सुखावला आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे चिमुकल्यानेही पावसाचा आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *