दसरा मेळाव्यासाठी ‘शिवतीर्था’ऐवजी सापडली दुसरी जागा ; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी झाल्यामुळे दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गट शिवतीर्थावर तयारीत आहे, जर तिथे जागा मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर करू, अशी माहिती शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (bharat gogavale) यांनी दिली आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा (dasara melava) घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटाने सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र दसरा मेळाव्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

‘दसरा मेळावा संदर्भात आम्ही तयारीला लागलो आहे. शिवाजी पार्क किंवा बिकेसी मैदानावर करू, या संदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. यामध्ये ठरेल. पण प्रथम प्राधान्य शिवाजी पार्कमध्ये असणार आहे, असं गोगावले यांनी सांगितलं.

‘आम्हाला जिथे जागा मिळेल तिथे आम्ही मेळावा करू, बाळासाहेब यांचे विचार दाखवून देऊ, कोणाला बोलवायचं हे उद्याच्या बैठकीत ठरेल, असंही गोगावले यांनी स्पष्ट केलं.

‘आमदार सदा सरवणकर यांनी काल सांगितले आहे की मी गोळीबार केलेला नाही. अशी घटना घडू नये यासाठी सदा सरवणकर यांनी खंत व्यक्त केली आहे. एफआयर दाखल झाला आहे त्यात स्पष्ट होईल, असंही गोगावले म्हणाले.

मनसेसोबत युती करायची की नाही, या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. अनेकजण आरोप करत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मला याची वस्तुस्थिती माहीत नाही त्यामुळे मी यावर बोलणार नाही, सभा तर होऊ द्या मग पाहू, असंही गोगावले म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीत दसरा मेळाव्या संदर्भात पूर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *