Gold Price Today : सोन्याच्या दरात आज घसरण, स्वस्तात सोनं खरेदीची संधी; चेक करा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात प्रति 10 ग्रॅम 309 रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात पहिल्याच दिवशी जवळपास 200 रुपयांच्या घसरणीची नोंद झाली आहे. सोनं स्वस्त झालं असलं तरी चांदीच्या दरात मात्र तेजी कायम आहे. चांदी आज 55076 रुपये प्रति किलो दराने खुली झाली आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50658 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याच वेळी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 50877 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 219 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.

मात्र यानंतरही, सोने आजही 5,542 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदीच्या दरात तेजी
आज चांदीचा दर 55076 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 54700 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 376 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *