आता फक्त ७५० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर, ‘असं’ लगेच बुक करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । तुम्हीही गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल. तर सरकारी मालकीची तेल कंपनी इंडेनने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला गॅस सिलिंडर स्वस्तात मिळू शकेल. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत तुम्हाला फक्त ७५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल. म्हणजेच तुम्हाला हा गॅस सिलिंडर सुमारे ३०० रुपयांनी स्वस्त मिळेल.

कंपोझिट सिलेंडरची सुविधा सुरू
इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरू केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी तुम्हाला फक्त ७५० रुपये खर्च करावे लागतील. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकता. या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. सध्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त आहेत. सध्या १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १०५३ रुपये आहे. अशा परिस्थितीत घरघुती गॅस वितरक कंपनी इंडेनकडून तुम्हाला ७५० रुपयांना सिलिंडर दिला जात आहे.

लवकरच हे सिलिंडर सर्व शहरांमध्ये होणार उपलब्ध
कंपोझिट सिलेंडर वजनाने हलके असतात. यामध्ये तुम्हाला १० किलो गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमत कमी आहे. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत. सध्या हे सिलिंडर २८ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी लवकरच हे सिलिंडर सर्व शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *