तुम्ही शेवटचं कधी खरं बोलला होतात ; शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ च्या निर्मात्यांवर नाराज?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । ‘तारक मेहता का उल्‍टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी अलविदा केला. त्यांनंतर काही दिवस कार्यक्रमातून तारक मेहता गायब होते. आता कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तारक मेहता परत येत असल्याची घोषणा केली. तारक मेहता ही भूमिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार सचिन श्रॉफ साकारणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये शैलेश लोढे यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टमध्ये शैलेश यांनी तारक मेहता कार्यक्रमाचे निर्माता असीत कुमार मोदी यांचं नाव घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

https://www.instagram.com/iamshaileshlodha/?utm_source=ig_embed&ig_rid=67aff572-533d-45c3-8624-9cc9e3e32db2

शैलेश लोढा यांची पोस्ट

शैलेश लोढा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कुणाचंही थेट नाव न घेता बरंच काही सूचक वक्तव्य केली आहेत.भलेही शैलेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जी कविता लिहिली आहे ती सध्याची परिस्थिती पाहता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे निर्माते असीत कुमार मोदी यांच्यावर असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शैलेश यांनी व्यंगात्म कविता लिहिली आहे.

या कवितेत त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांनी या पोस्टद्वारे मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर निशाणा साधला असल्याचं मत त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये आता सचिन श्रॉफ हा अभिनेता तारक मेहतांची भूमिका साकारणार आहे. अनेक दिवसांपासून तो या मालिकेत एंट्री करणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता प्रोमो प्रसिद्ध करून निर्मात्यांनी याची पुष्टी केली आहे. त्यानंतर शैलेश यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यावरून त्यांची नाराज दिसून येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *