महाराणी एलिझाबेथच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी यांच्या अंत्यसंस्काराला हिंदुस्थानच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान लंडनमध्ये अंतिम संस्कार होणार असून यावेळी मुर्मू श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. महाराणी एलिझाबेथ यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी त्यांना याआधीच श्रद्धांजली वाहिली असून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 12 सप्टेंबर रोजी ब्रिटिश उच्च आयोगात जात श्रद्धांजली वाहिली होती. तसेच 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता. महाराणीच्या अंत्यसंस्काराला जगभरातील अनेक देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *