महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । एका पाठोपाठ दोन खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं. दाढी करताना सलून चालक आणि ग्राहकांत वाद झाला. त्यातून सलून चालकानं ग्राहकास ठार मारलं तर या घटनेची ग्राहकाच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी सलून चालकास बेदम मारहाण केली. त्यात सलून चालकाचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : किनवट तालुक्यातल्या बोधडीत गुरुवारी सायंकाळी अनिल मारोती शिंदे हे व्यंकट सुरेश देवकर यांची दाढी करत हाेते. व्यंकटने अनिलला दाढी व्यवस्थित करत नाहीस, थोडं व्यवस्थित करं असे म्हटले. त्यातून दोघांत (youth) माेठा वाद झाला. रागाच्या भरात अनिलने व्यंकटच्या गळ्यावर हातातील वस्ताऱ्याने वार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने व्यंकटचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर व्यंकटचे नातेवाईक अनिलच्या दुकानाजवळ आले. त्यांनी अनिलला बाहेर काढून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात अनिलचाही मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता अनिलचं घरं आणि दुकानही संतप्त नातेवाईकांनी जाळलं. खून का बदला खून अशा झालेल्या या घटनेनं परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं.
दरम्यान पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.